कल्याण मध्ये घरफोडी
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.०६ – कल्याण पश्चिम ठाणकर पाडा येथील गणेश कृपा कॉलनी मध्ये राहणारे रवींद्र सोनार बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने कुलूप तोडत घरात प्रवेश करत घरातील सोन्या चांदीचे दागिने असा मिळून एकून ६५ हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. काल सकाळी घरी परतल्या नंतर त्यान घरात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
Please follow and like us: