कल्याण बोगद्यात तरुणाची हत्या करणारे अटकेत
कल्याण पूर्वेला कोळसेवाडीकडे जाणाऱ्या रेल्वेच्या बोगद्यात काल मध्यरात्री एका प्रवाशाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. विनोद सुर्वे असे या प्रवाशाचे नाव आहे. एकटा असल्याचं हेरून लूट करण्याच्या हेतूने त्याच्यावर हल्ला करण्यात आला.याप्रकरणी पोलिसांनी मुहम्मद शेख(२०) अंसार मुहम्मद शेख,विकास गणेश अंगारी (१९) या तिघांना अटक केली आहे. कोळसेवाडीचे वरिष्ट पोलीस निरीक्षक डीबी कांबले यांनी पोलीस उपयुक्त डॉ संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक बनवून या आरोपींना अटक केली आहे.
Please follow and like us: