कल्याण पूर्व रेल्वे बोगदयाजवळ लुटण्याच्या प्रकारातुन हत्या
लुटण्याच्या प्रकारातुन झाली हत्या
कल्याण पूर्व रेल्वे बोगदयाजवळ एका इसमाची हत्या झाल्याचे वृत्त आहे.लुटण्याच्या प्रकारातुन ही हत्या झाल्याचे सुत्रांचे म्हणणंं असून या घटनेने या परिसरात एकच खळबळ माजली आहे.आज पहाटे ३.३० वाजता ही ह्त्या झाली असून मृताकाचे नाव विनोद सुर्वे असे असल्याचे सांगण्यात येते आहे.पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार भिंतीवर डोके आपटून ही ह्त्या झाली असावी.तसेच दोन किंवा जास्त जणांनी हा हल्ला केला असावा असाही पोलिसांचा कयास आहे.दरम्यान सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवाण्यात आला असून कोळसेवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.
Please follow and like us: