कल्याण-डोंबिविली मनपा रुग्णालयाची अवस्था अत्यंत बिकट

 

मनपा रुग्णालयाच्या सुधारणेकरिता आम आदमी पक्षाकडून मूक निदर्शने

कल्याण-डोंबिविली मनपा रुग्णालयाची अवस्था अत्यंत बिकट असल्याने राज्य सरकारच्या आरोग्य सुविधांच्या दुरावस्थे विरोधात आम आदमी पक्षाकडून मूक निदर्शने करण्यात आली.
आम आदमी पक्ष प्रणित दिल्ली सरकारने सामान्य माणसाला केंद्रबिंदू समजून आरोग्य, शिक्षण या मूलभूत समस्यांना महत्व दिले आहे. या क्षेत्रात केलेल्या गुंतवणुकीमुळे सर्वसामान्य करदात्यांना याचा थेट लाभ मिळत आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाच्या मोहल्ला क्लिनिक संकल्पनेमुळे आज लाखो नागरिकांना मोफत आणि उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळत आहे.परंतु आम आदमी पक्षाचा आरोप आहेकी,महाराष्ट्रात परिस्थिती एकदम याउलट आहे.

कल्याण-डोंबिविलीचे मनपा रुग्णालय याचे अत्यंत लाजिरवाणे उदाहरण आहे. रुग्णालयाची इमारत अत्यंत विदारक अवस्थेत आहे. या रुग्णालयात डॉक्टर तसेच MRI, ICU या मूलभूत सुविधांचा वणवा आहे.गरीब नागरिकांना नाईलजाने येथेच येऊन उपचार घ्यावे लागतात. अशा वेळी उपचारासाठी लागणारा उशीर, औषधांसाठी होणारी पिळवणूक आणि एकूणच सडलेली यंत्रणा या सर्व चक्रव्यूहातून गरीब रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना जावे लागते.

मनपा रुग्णालयाच्या सुधारणेकरिता आम आदमी पक्षाच्या कल्याण-डोंबिविली शाखे कडून गेल्या एक वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार डोंबिविली शास्त्री नगर हॉस्पिटलसाठी जवळपास ३० कोटी तर कल्याण येथील रुक्मिणीबाई हॉस्पिटलसाठी १७ कोटी केवळ पगारावर खर्च करण्यात आले आहेत. बाकीच्या सुविधांसाठी साठी काय खर्च करन्यात आला?असा सवालही आम आदमी पक्षाने विचारला आहे.कल्याण-डोंबिविली मनपा रुग्णालयांचे त्वरित आरोग्य लेखा परीक्षण करण्यात यावे. तसेच या दोन रुग्णालयात हजारो रुग्ण येत असतात त्यामुळे ही रुग्णालये संपूर्ण सुविधा आणि पूर्ण कार्यक्षमतेने सुरू असावित अशी आपने मागणी केली आहे.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email