कल्याण डोंबिवली महापालिका रुग्णालयाचे प्रश्न स्थायी समिति मध्ये.

(श्रीराम कांदु )

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्री नगर रुग्णालयात रुग्णाना बाहेरच्या रुगणालयात पाठवले जात असल्या मुळे एका सर्पमित्र भरत केणे याचा वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्या प्रकरणी स्थायी समिती सभापती यांनी महापालिकेच्या मुख्य वैदयकीय अधिकारी डॉ स्मिता रोडे यांना धारेवर धरले. या वेळी स्थायी समिती सभापती यांनी स्थायी समितीत मुख्य वैद्यकीय  डॉ अधिकारी स्मिता रोडे ठनकावले की आपण येथील इंचार्ज आहात.ही आपली जबाबदारी आहे की येथे येणाऱ्या रुग्णाना दुसऱ्या रुगणालयात न पाठवता येथेच उपचार कसे मिळतील हे बघितले पाहिजे.या साठी कामात हयगय करणाऱ्या डॉक्टराना निलंबित करण्यात यावे अशी शिफारस स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी प्रशासनास केली.
या बरोबरच सभापती रमेश म्हात्रे यांनी एकाला कुत्र्या चावला प्रकरणी मी स्वता या बाबत डॉक्टरांना सांगितले असता त्यांनी आमच्या कडे कमी ओषधे आहेत असे सांगितल्याचे सभापती म्हात्रे यांनी स्थायी समिती सभेत सांगितले या वर ही करवाई करण्याचे आदेश दिले.या प्रश्नावर स्थायी समिती सदस्य विकास म्हात्रे यांनी देखील प्रश्न उपस्थित केला की आपणाला देखील खोकल्याच्या औषधाची आवश्यकता असल्याचे येथील डॉक्टरांना सांगितले असता ही औषधें कपाटात बंद करून ठेवल्याचा त्यांनी सांगितले . या बाबत आपण डॉ रोडे यांना सांगितले असलयाचे सदस्य विकास म्हात्रे यांनी स्थायी समितीत बोलताना सांगितले.
या वर उत्तर देताना मुख्य वैद्यकीय अधिकारी रोडे यांनी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांच्या तक्रारी वर बोलताना सांगितले की या बाबतचा अहवाला आयुक्त यांच्या कडे पाठविला आहे. मला कारवाई करण्याचे अधिकार नाहीत असे त्यांनी या बाबत सांगितले.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याणच्या रुक्मिणी बाई रुग्णालयात व डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाना कळव्यात शिवाजी किंवा मुंबईच्या लोकमान्य टिळक रुग्णलायत पाठविले जात आहे .या बाबत डोंबिवलीच्या शास्त्री नगर रुग्णालयाच्या भोंगळ कारभारा बाबत आवाज उठविल्याचे दिसून आले पण कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णलया बाबत कल्याणचे स्थायी समिती सदस्य किंवा महासभेत कल्याणचा कोणताही नगरसेवक आवाज उठविताना दिसून येत नाही. हेच समोर येत आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email