कल्याण डोंबिवली मध्ये धूम स्टाईल चोरट्यांनी एकच धुमाकूळ
कल्याण दि.२६ – कल्याण डोंबिवली मध्ये धूम स्टाईल चोरट्यांनी एकच धुमाकूळ घातला असून पादचाऱ्याचे मोबाईल,दागिने हिसकावून धूम ठोकण्याचे प्रकार वाढले आहेत या वाढत्या घटनांमुळे नागरिक धास्तावले आहेत. कल्याण पूर्वेकडील कोलशेवाडी परिसरात राहणार राहुल जाधव पूना लिंक रोड स्मशाना जवळून पायी चालत जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने दुचाकी आली. या दुचाकीवर मागे बसलेल्या इसमाने राहुल यांच्या हातातील मोबाईल हिसकावून तेथून क्षणार्धात धूम ठोकली.
या प्रकरणी राहुल याने कोलशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. तर दुसरी घटना कोलशेवाडी परिसरात घडली. कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा येथे राहणारे राजेंद्र डोंगरे सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोलशेवाडी शाखेसमोरून जात असताना भरधाव वेगाने दुचाकी अली या दुचाकी वर बसलेल्या दोन अज्ञात चोरट्यानी त्यांच्या जवळील मोबाईल हिसकावून तेथून पळ काढला. या प्रकरणी त्यांनी कोलशेवाडी पोलीस स्थनाकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे.