कल्याण डोंबिवली गुन्हे बातम्या

घराचे आमिष दाखवुन लाखोंचा गंडा

डोंबिवली  :
  दोन जणांना स्वस्त घराचे आमिष दाखवून एका त्रिकूटने तब्बल २ लाख ३०  हजारांना  गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे .या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात उमेश चव्हाण,सुरेश चव्हाण व विनोद चौधरी या त्रिकुटा विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
     उमेश चव्हाण,सुरेश चव्हाण व विनोद चौधरी या तीन कथित बिल्डरांनी कल्यान पश्चिमेकडील बोरगावकर कॉम्प्लेक्स येथे व्हीला बिल्डर्स एन्ड डेव्हलपर्स या नावाने कार्यलय थाटले होते .त्यांनी दोन वर्षांपूर्वी विविध वृत्तपत्रात कल्याण नजीक असलेल्या वसारगाव आणि भाल गाव येथे चाळीत स्वस्त घरे अशा आशयाच्या जाहिराती दिल्या .या आमिषाला भुलत २०१४  मध्ये मुलुंड येथे राहनारे सुधाकर कुरतोंडकर यांनी हे  कार्यलय गाठले या तिघांनी त्यांना वसार व भाल येथे स्वस्त दरात घरे देतो अमिश दाखवले या आमिषाला बळी ठरत सुधाकर यांनी त्याना २  लाख ३० हजार रुपये देऊ केले .मात्र तीन वर्षांचा कालावधी लोटूनही घराचा ताबा न दिल्याने सुधाकर यानि पैसे परत मागितले यावेळी या तिघांनी त्यांना  उडवा उडवी ची उत्तरे दिली तसेच भेटण्यास नकार दिला .या त्रिकूटने अशाच प्रकारे  शांती नवलगी यांची देखील फसवणूक केली .अखेर सुधाकर यांनी या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवली  असुज या तक्रारी नुसार पोलिसांनी उमेश चव्हाण,सुरेश चव्हाण व विनोद चौधरी या कथित बिल्डरांविरोद्धात गुन्हा नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे .
————————————————————————-
महिलांच्या टोळीचा चोरीचा डाव उधळला
डोंबिवली  :
    फेरीवाल्यांला महिलेलकडे कपडे खरेदी करण्याचा बहाणा करत तिला बोलण्यात गुंतवून तिच्या जवळील कपड्यांचे बंडल, मोबाईल व रोकड हिसकावून पळून जाण्याचा बेतात असनाऱ्या दोन महिलांना नागरिकांनी पकडून टिळक नगर पोलिसांच्या स्वाधीन केले तर या झटापटीत त्यांच्या दोन महिला साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाल्या .सुधा जाधव,मीनाक्षी गायकवाड असे अटक महिलांचे नाव आहे .
डोंबिवली पूर्वेकडील सागरलीं एकविरा निवास येथे राहानारी महिला याच परिसरातील बालाजी मंदिराच्या रोड वर कपडे विक्रीचा व्यवसाय करते .काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सदर महिला कपडे विक्री करत असताना चार महिला त्या ठिकाणी आल्या .त्यांनी कपडे विकत घेण्याचा बहाणा करत सदर महिलेला बोलण्यात गुंतवून कपड्यांचे बंडल,मोबाईल पर्स,रोकड घेऊन तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला .मात्र सदर महिलेने आरडाओरड केल्याने आसपासच्या नागरिकानि या पळून जाण्याचा बेतात असणाऱ्या महिलन हटकले .यावेळी दोन महिला या जमावाच्या हाती लागल्या तर त्यांच्या साथीदार दोन महिलांनि गर्दीचा फायदा घेत  तेथून निसटण्यात यशस्वी झाल्या .या दोन महिलन नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलिस्नी सुधा जाधव,मीनाक्षी गायकवाड या दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करत फरार दोन महिलांचा शोध सुरू केला आहे
————————————————————————————————————————
बिल देण्याच्या वादातून हॉटेल मालकासह कर्मचाऱ्याला बेदम मारहाण
डोंबिवली  :
   डोंबिवली पुर्वेकडील दावडी येथे राहणारे प्रभाकर शेट्टी यांचे पुर्वेकडील शेलार चौक येथे विक्रांत पॅलेस बार एन्ड रेस्टोरट आहे .काल रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास शेट्टी हॉटेल च्या गेत वर उभे होते त्यावेळी चार तरूणांनी बिलाच्या वादातून शेट्टी याच्याशी  हुज्जत घालत त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली .त्यानंतर संतापलेल्या या तरूणांनी शेट्टी यांच्यासह एक कर्मचाऱ्याला मारहाण करत तेथून पळून गेले .या प्रकरणी शेट्टी यांनी मारहाण करणाऱ्या चार अद्न्यत तरुणाविरोधात टिळक नगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिस्नी अद्न्यत तरुणाविरोधात गुन्हा दाखल।करत पुढील तपास सुरू केल आहे .
—–
उघडद्यावर खाद्यपदार्थ विक्रेत्यावर पोलिसी बडगा
डोसा विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
कल्याण :कल्याण पश्चिमेकडील राजस्थान जैन मंदिरा लगतच्या फुटपाथ वर ठाणकर पाडा येथे राहनार्य कृष्णा गौडा हा हातगाडीवर डोसा विक्री करत होता .अत्यंत गलिच्छ पद्धतीने तो खाद्य पदार्थ बनवत असून कोणत्याही प्रकारच्या सुरक्षित तेचि उपाय योजना  न करता विना परवानगी  रस्त्यावर शेगडीचा वापर करत नागरिकांच्या जीविताशी खेलत असल्याचे पोलिसांच्या निदर्शांस आले .बाजारपेठ पोलिसांनी हातगाडीवर उघडयावर खाद्य पदार्थ ठेवून मानवी जीवितास धोका निर्माण होईल तसेच कुणालाही दुखापत नुकसण होईल इतक्या बेदरकारपणे किंवा हायगायीने सुरक्षित तेच्या दृष्टने कोणतीही उपाय योजना न करता ज्वालाग्रहित शेगडीवर खाद्यपदार्थ तयार करत मानवी जीविताशी खेळत असल्याचा ठपका ठेवत कृष्णा गौडा या डोसा विक्रेत्या विरोधात गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे .
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email