डोंबिवली – कल्याण आणि डोंबिवलीत प्रथमच मीटर रिक्षा सक्तीची करण्यात आली आहे.पण त्याची अंमलबजावणी येथील रिक्षाचालक करीत नाहीत.शेअरचा पर्याय नको असलेल्या प्रवाशांकडून मीटर रिक्षाच्या सेवेची मागणी केली जात होती.मात्र रिक्षा चालकाची मनमानी सुरु असल्याने मीटर रिक्षाला रिक्षाचालकांनी ` लाल सिंग्नल` दिला होता. रिक्षा चालकांच्या उर्मटपणा बद्दल mh05autorikshawimp@gmail.com या आरटीओच्या इमेलवर तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे. ज्या रिक्षा चालकाची तक्रार प्रवाशांकडून केली जाईल त्या रिक्षा चालकाला ५०० आणि १००० रुपयाचा दंड आकारण्यात येणार आहे.वांरवार होणाऱ्या दंडात्मक कारवाईतून वाचण्यासाठी रिक्षाचालकाना प्रवाशांना सेवा देणे भाग पडेल असा विश्वास रिक्षा चालकांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या समाजसेविका वंदना सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.रिक्षा चालकांनी मीटरने सेवा देण्यास नकार दिल्यास त्याच्याशी वाद न घालता त्याच्या रिक्षा नंबर आणि वेळ ठिकाणासह आरटीओच्या इमेलवर तक्रार करण्याचे आवाहन त्यांच्या कडून करण्यात आले आहे.कल्याण डोंबिवलीतील अनेक रिक्षाचालक अवचासव्वा भाडे घेऊन नागरिकांची लूट करतात. मुबंई आणि ठाण्यात मीटर प्रमाणे भाडे आकारले जाते, त्याच प्रमाणे कल्याण डोंबिवलीत ही मीटर प्रमाणे भाडे आकारणे सक्ती करावी. जर कोणात्या प्रवाशाला मीटर नको पाहिजे असेल तर त्यांना शेरिंग पध्दतीने सोडावे. प्रवाशांच्या मागणी नुसार रिक्षा चाकलांनी भाडे आकारणी करावी असे सोनवणे यांनी सांगितले. जर या गंभीर मागणीकडे कल्याण उपप्रादेशिक अधिकारी ही योग्य लक्ष देत नसतील तर लवकरच या बाबतची तक्रार परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.