कल्याण डोंबिवलीत धूम स्टाईल लुटारुंचे थैमान
(श्रीराम कांदु)
कल्याण- कल्याण डोंबिवलीत धूम स्टाईल लुटारूनी एकच थैमान घातले असून पादचारी नागरिक विशेषत महिलांच्या गळ्यातील मौल्यवान दागिने लंपास करत क्षणार्धात धूम ठोकत असल्याचा घटना वाढीस लागल्या आहेत .
रायगड येथे राहणारी महिला 2 मे।रोजी कल्याण पूर्वेत राहणाऱ्या आपल्या नंदेकडे जाण्यासाठी कल्याण पूर्वेत आली होती .रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सदर महिला पूना लिंक रोड येथील तीसगाव नाका येथे पोचले असताना समोरून भरधाव वेगाने दुचाकी आली दुचाकीवर बसलेल्या इसमाने या महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचे दागिने चोरून क्षणार्धात धूम ठोकली .या प्रकरणी सदर महिलेने कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसानी अज्ञात दोन चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .तर दुसरी घटना काल रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली .अंबरनाथ येथील भालगाव येथे राहणारि महिला काल रात्री लग्न आटोपून कल्याण पश्चिम येथून रिक्षाने घराकडे परतत होत्या.यावेळी रामदासवाडी येथे भरधाव वेगाने दुचाकी आलाय या दुचाकीवर मागे बसलेल्या इसमाने या महिलेच्या गळ्यातील 80 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसवकावून धूम ठोकली .या प्रकरणी सदर महिलेने महात्मा फुले पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसानी 2 अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
चायनीज खाद्य पदार्थची गाडी चालवणा-या विरोधात कारवाई
जन्मदात्याने केला स्वता:च्याच मुलीवर बलात्कार