कल्याण डोंबिवलीत दाखले,वाटप शिबिराचे आयोजन
डोंबिवली -पिंंपलेशवर महादेव भक्त मंडळ ,तहसीलदार ,सुमित मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 8 जून व 10 जून रोजी डोंबिवली व कल्याण येथे ‘दाखले वाटप ‘शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
8 जून रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत होरायझोन हॉल,आनंद केमिकल जवळ,डी मार्ट जवळ डोंबिवली पूर्व येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजक प्रकाश म्हात्रे यांनी सांगितले
ज्येष्ठ ,उत्पन्न ,स्थानिक ,वास्तव्य ,जात ,वय ,अधिवास ,नॉन क्रिमिलेर आदी दाखले देण्यात येणार असून यासाठी आवश्यक प्रमाणपत्र आणावीत असे आवाहन प्रकाश म्हात्रे यांनी केले आहे
कल्याणात 10 जूनला
रविवार 10 जून रोजी कोळसेवाडी मॉडेल इंग्रजी स्कुल कल्याण येथे सकाळी 10 ते 1 पर्यंत शासकीय दाखले वाटप शिबीर शिवसेना खा डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाने व जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या सहयोगाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून दुपारी 4 नंतर दाखले देण्यात येणार आहेत
Please follow and like us: