कल्याण डोंबिवलीत तीन घरफोड्या
डोंबिवली दि.२२ – कल्याण डोंबिवली मध्ये चोरट्यांनी बंद घरे फोडत लाखोंचा ऐवज लंपास करण्याचा सपाटा लावला असून या वाढत्या गुन्ह्यांच्या आलेखामुळे नागरिक धास्तावले आहे. पोलीस यंत्रणा हि या गुन्ह्यांना आळा घालण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.
अंबरनाथ पूर्वेकडील कानसाई सेक्शन सम्राट प्लाझा येथे राहणारे विजय शिरसाठ यांचे डोंबिवली पूर्वेकडील नेहरू रोड येथील छत्रपती शिवाजी भाजी मार्केट मध्ये कपड्यांचे दुकानं आहे. गुरुवारी रात्री ते दुकानं बंद करून घरी निघू गेले असताना अज्ञात चोरट्याने त्याच्या दुकानातील ४६ हजार रुपये किमतीचे कपडे चोरून नेले. शुक्रवारी सकाळी हि बाब निदर्शनास आल्याने त्यांनी या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
दुसरी घटना कल्याण पूर्वेकडील विजय नगर परिसरात घडली आहे. कल्याण पूर्व विजय नगर परिसरात सुनिता कॉलनी मध्ये राहण-या महिला गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते हि संधी साधत गुरुवारी रात्री च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्याच्या घरचे कुलूप तोडून घरातील सोन्या चांदीचे दागिने मिळून एकूण 91 हजारांचा मुद्देमाल चोरला सकाळी घरी परतल्या नंतर त्यांना घडला प्रकार लक्षात आला त्यांनी या प्रकरणी कोल्शेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
तिसरी घटना शहाड परिसरात घडली आहे. टिटवाळा येथे राहण्रे आनंद राम याचा शहाड येथील अंबर हॉटेल नजीक श्रीकृष्ण सोसायटी मध्ये संगम संगम फोटो स्टुडीयो आहे. १० जून रोजीते नेहमी प्रमाणे रात्री दुकानं बंद करून घरी निघून गेले अज्ञात चोरट्याने बंद दुकानाचे कुलूप तोडून दुकानातून ६५ हजार रुपये किमतीचे चार कमेरे चोरून नेले. दुस-या दिवशी त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले त्यांनी या प्रकरणी शुक्रवारी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे .