कल्याण डोंबिवलीत घरफोडीचे सत्र सुरू
कल्याण – कल्याण डोंबिवली मध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरट्यानी एकच धुमाकूळ घातला असून काल कल्याण डोंबिवली मध्ये दोन घरफोडयांच्या घटना उजेडात आल्या आहेत .या प्रकरणी कोळशेवाडी व टिळक नगर पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे .
कल्याण पूर्वेत काटेमानवली नाना पावशे चौक शिवसदन इमारती मध्ये राहणारे अविनाश भारद्वाज धुलीवंदन निमित्त आपल्या राहत्या घराला कुलूप लावून आपल्या भावाच्या घरी गेले होते .घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यानी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मिळून एकूण 1 लाख 14 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला .काल सायंकाळी घरी परतल्या नंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी कोळशेवाडी पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसानी अद्न्यत चोरट्या विरोधात गुन्हा नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे .
दुसरी घटना डोंबिवली पूर्व येथे घडली आहे .डोंबिवली पुर्वेकडील संत नामदेव पथ देवज्ञ कॉलनी पराग बंगला येथे राहणारे 66 वर्षीय सतीश बांदिवडेकर हे काल सकाळी घराला कुलुप लावून कामानिमित्त बाहेर गेले होते घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने मागील बाजूस असलेल्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसाह 1 लाख 98 हजरांचा मुद्देमाल चोरून नेला .रात्री नऊ वाजन्याच्या सुमारास घरी परतल्या नंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी टिळक नगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसानी गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .