कल्याण डोंबिवलीतून एक कार सह दोन रिक्षा चोरी
डोंबिवली 23 : कल्याण डोंबिवली सह आसपासच्या परिसरात वाहन चोरट्यांनी एकच धुमाकूळ घातला असून वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे त्यातच काल डोंबिवली व कल्याण मधून एक कार व दोन रिक्षा चोरीला गेल्याच्या तक्रारी विविध पोलीस स्थानकात दखल झाल्या आहेत .डोंबिवली पूर्वेकडील आयरे गाव भीमाबाई निवास येथे राहणारे नंदकुमार पवार यांच्या मालकीची रिक्षा असून रिक्षा चालवून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात .रविवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास पवार यांनी मानपाडा रोड येथील एका प्रसाधन गृहा समोर रिक्षा उभी करत ते लघुशंकेसाठी गेले .हि संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांची रिक्षा व रिक्षातील मोबाईळ घेवून धूम ठोकली .तीन दिवसांच्या शोधा नंतरही रिक्षा ण सापडल्याने अखेर पवार यांनी टिळक नगर पोलीस स्थानकात तक्रार दखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दखल केला आहे .तर कल्याण पूर्वेत कोळसेवाडी नेतिवली आनंद वाडी परिसरात राहणारे गणेश गायकवाड यांनी गत सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आपली रिक्षा कल्याण पश्चिमेकडील संतोषी मारा रोड वर उभी करत काही वेळा करिता बाहेर गेले हि संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांची रिक्षा चोरून नेली या प्रकरणी गायकवाड यांनी काल महत्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दखल केली अससून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दखल केला आहे तर कल्याण पश्चिमेकडील सर्वोदय मधील पार्किंग मध्ये पार्क केलेली एक कार अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे कल्याण पुर्वेकडील चिंचपाडा परिसरात न्यू गजलक्ष्मी सोसायटीमध्ये राहणारे नितीन संदाशिव य्णाई काल दुपारी डिच वाजण्याच्या सुमारास आपली कार कल्याण पश्चिमेकडील सर्वोदय मॉल मधील पार्किंग मध्ये पार्क केली होती अज्ञात चोरट्याने त्यांची कार चोरून नेली .मॉल मधून परतल्या नंतर त्यांना कार चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
Please follow and like us: