कल्याण डोंबिवलीतील कचरा प्रश्न सोडविण्यासाठी भाजप महिला पदाधिकाऱ्यांची आयुक्तांशी चर्चा

यावेळी पालिका आयुक्तांनी ओला कचरा व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्याबाबत जोरदार प्रयत्न सुरु असून त्याप्रमाणे नागरिकांमध्ये जनजागृती चालू आहे. मात्र यात नागरिकांचा सक्रीय सहभाग असणे आवश्यक असले पाहिजे असे पालिका आयुक्त बोडके यांनी सांगितले. यावेळी डॉ. पाध्ये यांनी भाजप महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या कचरा प्रश्न सोडविण्यासाठी जनजागृती करणार असल्याचे डॉ. पाध्ये यांनी आयुक्त बोडके यांना सांगितले. सदर बैठकीस दमयंति भानुशाली वर्षा परमार, संगिता गुंजाल, जया सोनावणे, स्वाती जिमुर, मलिका पुजारी, रसिका पाटील, निशा कबरे, निर्मला क़दम ,रेखा पाटील ,सानिका काळे,तृप्ति दराडे, वासंती कुलकर्णी, वैशाली ठोसर आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
Please follow and like us: