कल्याण – ठाकुर्ली रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे रुळाला तडे
डोंबिवली दि.०३ – मध्य रेल्वेवरील तांत्रिक बिघाडांचे सत्र सुरुच असून सोमवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास कल्याण ठाकुर्ली दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने पुन्हा अर्धा तास वाहतूक खोळंबली होती .कल्याण ठाकुर्ली दरम्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेलवे रुळाला ५ मीटर च्या अंतरावर दोन तडे गेले होते. दरम्यान वाहतुक धीम्या रुळावरून वळण्यत आली. त्यामुळे लोकल उशिराने धावत होत्या रेल्वे प्रशासनाने तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेत अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्ना नंतरदुरुस्त केला.
मध्य रेल्वे च्या मार्गावर गेल्या महिनाभरपसून कधी सिग्नल यंत्रणेत बिघाड कधी मालगाडीच्या इंजिन मधील बिघाड ,कधी रुळाला तडे मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती. या घटनांनी प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला असतानाच सोमवारी देखील कल्याण- ठाकुर्ली दरम्यान रुळाला तडे गेल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने रविवारच्या सुट्टीचा आनंद उपभोगून पुन्हा सोमवारी कामावर निघालेल्या चाकरमान्यांचा मध्य रेल्वेच्या गलथान कारभारामुले मनस्ताप सहन करावा लागला. मध्य रेल्वे च्या मार्गावर गेल्या आठवडाभरापासून तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे वाहतुक विस्कळीत होण्याचे घटना वाढीस लागले आहेत. रेल्वे प्रशासन देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली आठवड्यातून एक दिवस मेगा ब्लॉक घेते मात्र त्यानंतर ही या घटना सातत्याने घडत असल्याने प्रवासी वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे .