‘ अवयवदान महादान ‘ संकल्पनेवर आधारित चित्ररथ
(श्रीराम कांदु)
कल्याण – कल्याण संस्कृती मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नववर्ष स्वागतयात्रेमध्ये जायंट्स ग्रूप ऑफ कल्याणचे वतीने ‘ अवयवदान महादान ‘ संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारण्यात आला होता.
या अंतर्गत अवयवदान म्हणजे काय, कोण, कोठे, कसे करु शकतो, त्यासंबंधी असलेल्या शंका याची सविस्तर माहिती असलेली पत्रके वाटण्यात आली. जायन्ट्सचे डेप्युटी वर्ड चेयरमन राजेशभाई जोशी ,फेडरेशन पदाधिकारी अशोक मेहता यांचे हस्ते उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमात ॲड यतीन गुजराथी, योगेश जोशी, प्रेसिडेंट हेमंत नेहेते , महेश पाल, राजेंद्र भट, डायरेक्टर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन मच्छिंद्र कांबळे, रामदास डोइफोडे, प्रमोद जोशी, पवनकुमार सक्सेना , गीता जोशी यांनी लोकांनपर्यंत जाऊन अवयवदानाचे महत्व समजावून सांगितले. या उपक्रमाला आमदार नरेंद्र पवार आणि खासदार कपिल पाटील यांनी भेट देउन शुभेच्छा दिल्या. अवयवदाना विषयी माहिती हवी असल्यास हेमंत नेहेते ८७७९६४४९९२ , मच्छिंद्र कांबळे ९९६७५५२१९५ , ॲड यतीन गुजराथी ९३२०५१९०२६ , योगेश जोशी ९७५७०७७६१४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Please follow and like us: