कल्याण आणि डोंबिवली स्थानकात होणार रेल्वे प्रवासी महासंघातर्फे निषेध आंदोलन

डोंबिवली – रेल्वेला आर्थिक बाजूने घवघवीत महसूल देणाऱ्या स्थानकांमध्ये डोंबिवली आणि कल्याण शहरांचा नंबर आघाडीवर आहे. परंतु सोई-सुविधांचा विचार केला तर परिस्थिती खूपच वाईट आहे. रेल्वे समस्या आणि अपघाताचे प्रमाण मोठे आहे. रेल्वेत होणाऱ्या तुडुंब गर्दीने प्रवाश्यांचे जीव धोक्यात आले आहेत. रेल्वे प्रशासनाची कुचकामी यंत्रणा आणि ढिसाळ कारभार प्रवाश्यांना वेठीस धरीत आहेत. या सर्व गोष्टीला वाचा फोडण्यासाठी रेल्वेच्या वाढदिवस दिनी म्हणजेच सोमवारी 16 ता  रेल्वे प्रवासी महासंघाच्या माध्यमातून जाहीर निषेध करण्यात येणार आहे. महासंघाचे निषेध आंदोलन कल्याण आणि डोंबिवली स्थानकात होणार आहे.
महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघा तर्फे सोमवार दि. 16 एप्रिल रोजी कल्याण आणिडोबिवली रेल्वे स्थानकात अनोखे आंदोलन होणार आहे. रेल्वेचा वाढदिवस म्हणून प्रथम शुभेच्छा आणि त्यानंतर “मुक मोर्चा”ने जाहीर निषेध करण्यात येणार आहे. रेल्वेत वारंवार होणाऱ्या रेल्वे दुर्घटना व त्यात जाणारा रेल्वे प्रवाशाचा जीव, वाढलेली गर्दी, अयोग्य नियोजन, रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार, ब्रिटिशकालीन यंत्रणात्यात कोणतीही नवी सुघाखणा नाही, रेल्वे कामगाराची कपात आदी समस्यांनावरप्रशासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे.
 
कल्याण आणि डोंबिवलीत होणारे निषेध आंदोलन हे कल्याण रेल्वे स्टेशन (प)तिकिट खिडकीजवळ सकाळी ९ वाजता तर डोंबिवली रेल्वे स्टेशन (पुर्वे) रामनगर,तिकिट खिडकीजवळ सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे अशी माहिती रेल्वे प्रवाशी महासंघाचे अभिजित धुरत यांनी दिली. याबाबत दिलेल्या माहितीनुसार मध्य रेल्वे मार्गावर वारंवार तांत्रिक बिघाड होऊन रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकारहोत आहे. डोंबिवली ते दिवा दरम्यान गर्दी, लोकल गाडय़ामध्ये तांत्रिक बिघाडयामुळे रेल्वे सेवा खोळंबून पडते. मध्य रेल्वे प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्ररोज पाहायला मिळत आहे. रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने इच्छित स्थळी,घरी, नोकरीवर उशिरा पोहचणे अशा प्रकाराने नोकरदार संतप्त झाले आहेत.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email