कल्याण ‘अँटी रॉबरी स्कॉड’ची धडाकेबाज कारवाई : दोघांना अटक ८ गुन्हे उघडकीस

कल्याण – ठाणे पोलीस परिमंडळ-३च्या अंतर्गत ‘अँटी रॉबरी स्कॉड’च्या पथकाने दोन इराणी चोरटयांना पकडून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीं पैकी एकाचे नाव जाफर युसूफ जाफरी ऊर्फ चव्हाण,वय-२० वर्ष,राहणार आंबिवली,तर दुसरा आरोपी जाफर गुलाब ईराणी ऊर्फ मुंडा,वय-२० वर्ष, राहणार आंबिवली असून या दोघांकडून १२ महागडे मोबाईल व चोरीची मोटरसायकल असा एकूण रु.१,६४,०००/- किमत्तीचा माल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच डोंबिवली,नारपोली,उल्हासनगर,कोळशेवाडी,श्रीनगर,कापूरबावडी व टिळकनगर अशा पोलीस ठाण्यातील जबरी चोरीचे ८ गुन्हे उघडकीस आले आहेत या प्रकरणी कल्याण परिमंडळ – ३ चे पोलीस उपायुक्त डॉ.संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अँटी रॉबरी स्कॉड’चे पथक तपास करीत आहे.

Hits: 12

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email