कल्याणात बोगस डॉकटर गजाआड
डोंबिवली – कल्याण डोंबिवलीत बोगस डॉकटरांचा सुळसुळाट झाला असून बोगस सर्टिफिकेट च्या आधारे डॉकटर म्हणून दवाखाना थाटनाऱ्या एका बोगस डॉकटरचा बाजार पेठ पोलिसांनी भांडाफोड करत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .रफिक नासिर असे या बोगस डॉकटर चे नाव असून तो मुंब्रा येथे राहात होता.
मुंब्रा अमृत नगर रझा गार्डन येथे राहणार रफिक शेख ( २९ ) हा कल्याण पश्चिमेकडील जोकर सिनेमाच्या बाजूला दवाखाना थाटून बसला होता .काल बाजार पेठ पोलीस स्थानकाचे पोलीस नाईक सचिन साळवी यांनी त्यांच्या दवाखान्यात छापा टाकला असता त्याच्याकडे शिक्षणासंबंधी व वैद्यकीय व्यवसाया संबंधी कोणतेही प्रमाणपत्र उपलब्ध नसताना किंवा पदवी पदविका लायसन्स नसताना तसेच दुसऱ्याच्या नावाने वैद्यकीय प्रमाणपत्रचे फोटो भिंतीवर लावून लोकांचे उपचार करत त्यांची फसवणूक करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले .या प्रकरणी साळवी यांनी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसानी रफिक शेख विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .
Please follow and like us: