कल्याणात पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
(श्रीराम कांदु)
डोंबिवली -मुंबई पोलीस दलात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल महेश अहिवळे यांनी कल्याण मधील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली .महेश मुंबई येथील चार रस्ता पोलीस स्थानकात कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी रजा घेतली होती. मात्र रजा संपल्या नंतर ते कामावर रुजू झाले नव्हते. त्यांच्या मृतदेहाजवळ सुसाईडनोट सापडली आहे .मृत्यूपूर्वी महेश यांनी सुसाईड नोट लिहली आहे. ज्यामध्ये आपल्या पत्नीने आपल्या समजून घेतले नसल्याचे नमूद करत त्यांनी समाज आणि नातेवाईकांची माफी मागितली आहे .याबाबत कोळशेवाडी पोलिसानी नोंद करत सुसाईड नोट च्या आधारे महेश यांनि आत्महत्या केली याबाबत पोलिसानी तपास सुरू केला आहे
मुंबई पोलीस दलात मुंबई येथिल चार रस्ता येथे कॉन्स्टेबल पदी कार्यरत असणारे महेश अहिवळे हे कल्याण पुर्वेकडील मलंग रोड अनमोल गार्डन येथे आपली पत्नी व मुलासह राहत होते .त्याची पत्नी ब्युटी पार्लर चा व्यवसाय करते .काल सायंकाळी त्यांची पत्नी बाहेर गेली असताना महेश यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली .रात्री साडे नऊ च्या सुमारास त्यांची पत्नी घरी परतल्या नंतर घडलेला धक्कादायक प्रकार पाहून तिला धक्का बसला .याबाबत कोळशेवाडी पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे .दरम्यान महेश यांंच्या मृतदेहाशेजारी त्यांनी मृत्यूपूर्वी लिहलेली सुसाईड नोट सापडली असून या सुसाईड नोट मध्ये त्यांनी
आपल्या पत्नीने आपल्या समजून घेतले नसल्याचे नमूद करत त्यांनी समाज आणि नातेवाईकांची माफी मागितली आहे .याबाबत कोळशेवाडी पोलिसानी नोंद करत सुसाईड नोट च्या आधारे महेश यांनि आत्महत्या केली याबाबत पोलिसानी तपास सुरू केला आहे.
Please follow and like us: