कल्याणात दोन घरफोडी
डोंबिवली : कल्याण पूर्वेकडील आडीवली ढोकळी येथील मंगल अपार्टमेंट राहणारे संदीप शेट्टी काल सकाळी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते हि संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून त्यांच्या घरातील ४१ हजारांचा मुद्देमाल तसेच शेट्टी यांच्या बाजूला राहणाऱ्या त्यांच्या मेव्हण्याच्या घराचे कुलूप तोडून त्यांच्या घरातील ७४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून पसार झाला .सायंकाळी घरी परतल्या नंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे . तसेच आडीवली येथील एकविरा अपार्ट मेंट राहणारे मिथुन भोई हे दुपारी कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील एकूण ४८ हजार रुपये किमतीचे सोन्यचे दागिने लंपास केले .या प्रकरणी त्यांनी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी या तक्रारी नुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.