कल्याणला जागेची पहाणी करण्यसाठी गेलेल्या पालिका अधिकाऱ्यांना मारहाण
डोंबिवली दि.१७ – केंद्र सरकारच्या अमृत येाजनेअंतर्गत कल्याण येथील उंबर्डे येथे मलउदंचन केंद्राच्या जागेची पहाणी करण्यासाठी कल्यण डोंबिवली महापालिकेचे काही अधिकारी,कर्मचारी गेले असता अचानक आठ दहा जणांनी लाठया काठया घेऊन कर्मचा-याना जबर मारहाण केली यामध्ये पालिकेचे सर्वेअर श्रीराम झोपले जबर जखमी झाले असून त्याना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून इतर पाच सहा जणांनाही मारहाण करण्यात आली आहे हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या म्युनिसिपल कर्मचारी सेनेने केली असून अन्यथा उद्या गुरुवारी महापालिका बंद करण्याचा इशारा दिला आहे.
उंबर्डे गावात मलउदंचन केंद्राचे काम सुरु असून त्या जागेची पहाणी करण्यासाठी महापालिकेचे ज्युनिअर इंजिनियर श्रीराम झोपळे,अनुरेखक मधुकर कोल्हे,तसेच महराष्ट्र जीवन प्रधिकरणाचे इंजिनियअर,त्यंाचे कर्मचारी,ठेकेदाराचे कर्मचारी अशा सात आठ जणांना अचानक अज्ञात लोकांनी धक्काबुक्की केली व जबर मारहाण करण्यास सुरवात केली.या मारहाणीत एकूण सात आठ जण जखमी झाले असून सर्वात जास्त मार श्रीराम झोपळे यांना बसला असून त्याना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या डोक्याला पाच सात टाके पडल्याचे सांगण्यात आले.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कर्मचाऱ्याना ज्या भ्याड पध्दतीने मारहाण करण्यात आली त्याचा म्युनिसिपल कर्मचारी सेनेने तीव्र निषेध केला आहे या संदर्भात बोलताना सेनेचे उपाध्यक्ष रवी पाटील म्हणाले,पालिकेच्या कर्मचार्यावर अचानक अशा प्रकारे हल्ला करणे धोकादायक असून हा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे मारहाण करणार्या अज्ञात लोकांचा शोध धेऊन त्याचे वर कडक कारवाई न केल्यास उद्या गुरुवारी पालिकेत काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यानी दिला.सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्याबददल खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.