कल्याणमध्ये मनसेचे खड्ड्यांवरून पुन्हा एकदा उस्फुर्त आंदोलन !

कल्याण – मागील कित्येक दिवसांपासून कल्याण-डोंबिवली परिसरात मनसेने खड्ड्यांविरोधात धगधगते आंदोलन सुरू ठेवले आहे

काल दुपारी मुरबाड रस्त्यांवर वॉर्ड क्रमांक ३८ तर्फे खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते,त्याच दरम्यान दिवसा बंद असलेली अवजड वाहतूक सर्रासपणे सुरू होती त्यामुळे खड्डे बुजविण्यासाठी त्रास होत होता.अवजड वाहनांच्या बेजबाबदारपणामुळे मागील काही दिवसांत नागरिकांचे नाहक बळी गेले आहेत.

दिवसा अवजड वाहनांची वाहतुकीसाठी बंदी असताना वाहतूक पोलिसांच्या चिरीमिरीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो,खड्डे बुजविण्यासाठी त्रास होत असताना मनसेने अचानक ठिय्या आंदोलन सुरू केले,वाहतुकीवर याचा परिणाम झाल्याने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांनी धरपकड करून महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात घेऊन आले

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे यांनी आंदोलनकर्त्यांनी बाजू समजून घेऊन संबंधित विषय वरिष्ठांच्या कानावर घालून स्वतः पुढाकार घेऊन सोडवतो असे आश्वासन दिले. यावेळी माजी आमदार व सरचिटणीस प्रकाश भोईर,माथाडी कामगार सेनेचे सहचिटणीस राजन शितोळे,जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर, जिल्हा अध्यक्षा स्वाती कदम,नयना भोईर,शहर अध्यक्षा शीतल विखणकर, नगरसेविका तृप्ती भोईर,शहर संघटक स्मिता खरे,वासंती जाधव,रोहन पवार,शहर सचिव अर्चना चिंदरकर,सुरेखा महाजन आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या उस्फूर्त आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्षा स्वाती कदम,शहर अध्यक्षा शीतल विखणकर, शहर संघटक स्मिता खरे,उपशहर अध्यक्षा गीता काट्रप,रोहन अक्केवार,वैभव देसाई व गौरव जाधव,गणेश बोरहाटे,मिलिंद चौधरी,अमित गव्हाणे,मनमित सिंग,जयेश जोशी,हर्षल कदम,शिवम करोशिया,जॉनी अँथनी व स्वप्नाली कदम यांनी केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email