कल्याणमध्ये भव्य आंबा महोत्सव,शेतकऱ्यांच्या बागेतून आंबा थेट पोहोचणार ग्राहकांपर्यंत

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने भव्य आंबा महोत्सव 

कल्याण – दि. २५ – फळांचा राजा, आंबा!! संपूर्ण देशात उत्पादन घेतले जाणारे हे फळ, प्रदेशानुसार त्याच्या चवीत, रंगात, आकारात वैविध्य दिसते. मात्र कोकणी हापूसची लज्जत काही न्यारीच ! विमानाने प्रवास करणारे हे एकमेव फळ. असा हा दर्जेदार, नैसर्गिकरित्या पिकविलेला फाळांचा राजा आंबा कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरकरांसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना हा हापूस आंबा य़ेट उपलब्ध व्हावा व शेतकऱ्यांनाही थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून व अजिंक्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त सहभागातून भव्य आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. १ मे ते शनिवार दि. ५ मे २०१८ या कालावधीत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ड प्रभाग समिती कार्यालयासमोरील मैदान, कल्याण (पूर्व) येथे हा महोत्सव होणार आहे.

या आंबा महोत्सवाचे उद्घाटन मंगळवार दि. १ मे २०१८ रोजी सायं. ५ वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक ऊपक्रम) ना. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते होणार आहे. विधानपरिषदेचे आमदार डॉ. जगन्नाथ (आप्पा) शिंदे हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. शहराच्या विकासाला गती देणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव होत असून खा. डॉ. शिंदे या महोत्सवाचे स्वागताध्यक्ष आहेत.

      पर्यटन, आधुनिक शेती, कृषि उत्पन्न प्रक्रिया, उद्योग, वनौषधी विकास इ. अनेक क्षेत्रात ज्यांना व्यवसाय व गुंतवणूक करायची आहे, अशा उद्योजकांना उद्योग व्यवसाय संधीची माहिती या उपक्रमातून मिळणार आहे. याशिवाय येथील शेतकरी, भूमिपूत्र, तरूण मुंबईकरांना आपल्या जमिनी विकसित करायच्या असतील तर या क्षेत्रातील तज्ज्ञ, बॅंका, शासकीय विभागांचे मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर मिळू शकेल. या उपक्रमात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, MSCDA / AIOCDA, MCHI, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, जिल्हा बॅंक, नाबार्ड तसेच कृषि, पणन व फलोत्पादन विभाग यांसारखे शासकीय विभाग सहभागी होणार आहेत.

     यावेळी पर्यटन, कृषि, फलोत्पादन, पणन या चार व्यवसायांचे मार्गदर्शन मिळणार आहे. पाच हजारांहून अधिक व्यावसायिक, गुंतवणूकदार, आंबा बागायतदार शेतकरी, भविष्यातील तरूण उद्योजक, पर्यटन व्यावसायिक या उपक्रमात सहभागी होणार असून प्रत्यक्ष माहिती घेतील. याशिवाय एक लाखाहून अधिक नागरिक या भव्य महोत्सवात सहभागी होतील. महाराष्ट्राचा जागतिक ब्रॅंड विकसित करणारा, गुंतवणुकीला चालना देणारा व स्थानिक तरूण, शेतकरी यांना स्वयंरोजगार निर्मितासाठी दिशा व मार्गदर्शक ठरणारा हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email