कल्याणमध्ये पार्कींग केलेल्या गाडीवर झाड पडून गाडीचे नुकसान
कल्याण – गाडी मालकाने सावलीखाली गाडी उभी केली तेच झाड पडल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले. कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नसली तरी गाडीच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.ही गाडी नेमकी कोणाची होती याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. खडकपाड्याच्या गोदरेज हिल परिसरात हा प्रकार घडला.या घटनेची माहिती मिळताच महापालिका अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत गाडीवर पडलेले झाड बाजूला केले.
Please follow and like us: