कल्याणमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आसिफ झोजवाला यांची  आत्महत्या

डोंबिवली – कल्याणमधील नामांकित बांधकाम व्यावसायिक आसिफ झोजवाला यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यावर शहरात खळबळ उडाली आहे.ओपन लैड टेक्सची थकबाकीच्या दबावा मूळे आसिफ यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कल्याण एमसीएचाआयच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे मात्र आसिफ यांनी आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करीत आहेत ते.या संदर्भात एमसीएचाआयचे सदस्य मुख्यमंत्र्यांशी भेट घेणार आहेत कुटुंबीयांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

आसीफ झोजवाला हे कल्याण पश्चिमेतील कल्याण मुरबाड रोडवरील राणी मॅन्शन येथे आपल्या कुटुंबीय सोबत राहत होते. सोमवारी सायंकाळी त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली .आसिफ यांचा मृतदेह महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आलेला होते आज सकाळी त्यांचा अंतविधी करण्यात आली . अखेर झोजवाला यांनी आत्महत्या का केली या प्रकरणाचा तपास महात्मा फुले पोलिस ठाण्याचे पोलिस करीत आहे. आसिफ यांनी आत्महत्या का केली हा तपासाचा भाग असला तरी  कल्याण  एमसीएचआयच्या पदाधिकाऱ्यानी  आसिफ झोजवाला यांचा आत्महत्येसाठी महापालिकेला जवाबदार ठरविले आहे. त्यांनी  ओपन लॅण्ड टॅक्स न भरल्याने महापालिकेने आसिफ यांची  मालमत्ता काही दिवसापूर्वी महापालिकेने जप्त करत या मालमत्तेचा  एक रुपयात लिलाव केला होता. या घटनेचा बहुधा आसिफ यांनी धसका घेतला होता. याविषयी आसिफ झोजवाला या संदर्भात एससीएचआयचे पदाधिकारी यांच्याशी वारंवार बोलत होते असा आरोप केला आहे .या संदर्भात एमसीएचाईचे सदस्य मुख्यमंत्र्यांशी भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले .झोजवाला कुटुंबीयांनी आसिफ यांचा आत्महत्या प्रकरणी  काही सांगण्यास नकार दिला आहे. आसिफ झोजवाला भाजपच्या अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी ही हाेते.

Hits: 27

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email