कल्पना शाह ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित
ठाणे: येथील कवयित्री लेखिका व शिक्षिका सौ कल्पना शाह यांना मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मराठी भाषा सक्षमीकरणासाठीचा ‘जीवन गौरव पुरस्कार २०१९’ नागपूर येथे प्रदान करण्यात आला.
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठीचे शिलेदार संस्थेने दि २७/०२/२०१९ रोजी ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह, उरवेला कॉलनी नागपूर येथे आयोजित केलेल्या ‘भेट मराठी मनांची’ काव्यप्रेमी शिक्षकांच्या दुस-या राज्यस्तरीय कवी संमेलनात प्रमुख उद्घाटक डॉ.रवींद्र शोभणे ज्येष्ठ कथा कादंबरीकार,अध्यक्ष कवी नागोराव कोंपलवार, प्रमुख पाहुणे डॉ.रामकृष्ण छांगाणी, सहसचिव राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटल नागपूर, प्रणाली राऊत रंगकर्मी, नाट्य अभिनेत्री, मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक राहुल पाटील, सचिव ॲड.पल्लवी पाटील , विश्वस्त प्रमुख अशोक लांडगे, डॉ.सोहन चवरे, ज्येष्ठ कवी श्रीराम केदार जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब जि.प.कर्मचारी संघटना नागपूर जिल्हा, परशराम गोंडाणे, राज्य संघटन सचिव, कास्ट्राईब शिक्षक संघटना, अजय गावंडे, जनार्धन वाघमारे, अरूण चांदेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.