कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचं दोन दिवसात ३३ कोटींचं नुकसान

मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचं दोन दिवसात ३३ कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. एसटी संपाच्या दुसऱ्या दिवशी एसटीचा १८ कोटी रुपयांचा महसूल बुडाला, तर पहिल्या दिवशी १५ कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं.दिवसभरात महाराष्ट्रातील २५० आगारातून सुमारे ३० टक्के बसच्या फेऱ्या सुटल्या. राज्यातील २५ आगार पूर्ण क्षमतेने चालू होते. तसेच १५१ आगारामध्ये अंशतः वाहतूक सुरु होती.राज्यातील ९७ आगारातून दिवसभरात एकही बसची फेरी बाहेर पडली नाही.या संपाचे परिणाम मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, या जिल्ह्यात मोठया प्रमाणात जाणवत आहेत.तुलनेने मराठवाडा आणि विदर्भामध्ये ४० टक्के वाहतूक सुरु होती.संध्याकाळी चार वाजेपर्यंत होणाऱ्या ३२ हजार १४८ बस फेऱ्यांपैकी सहा हजार ३०८ फेऱ्या सुरळीत सुरु होत्या.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email