कमी व्याजदरात कर्जाचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा 

डोंबिवली – कमी व्याजदरात कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत अणेंकाना मिळून  तब्बल सहा लाख 11 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना डोंबिवलीमध्ये उघड झाली आहे .या प्रकरणी विष्णू नगर पोलीस स्थानकात शिवराम शशिकांत कदम व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करन्यात आले असून त्यांचा शोध सूरु केला आहे .
ठाणे वागळे इस्टेट किसन नगर परिसरात राहणारे यशवंत निबरंगी याना कर्जाची गरज होती .ही गरज ओळखून डोंबिवली येथील शिवराम कदम व त्याच्या सहकाऱ्यांनी निबरंगी याना फेब्रुवारी महिन्यात कमी व्याजदरात कर्ज मिळवून देतो असे आमिष दाखवत पैशाची मागणी केली  .या आमिशला बळी पडून निबरगी यांनी त्यांना पैसे देऊ केले .मात्र तीन महिन्यांच कालावधी लोटून ही कर्जबाबत काहीच हालचाल न झाल्याने त्यांनी जाब विचारण्यासाठी त्यांना  संपर्क साधला सुरुवातीला कदम याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने निबरंगि यांनी डोंबिवली येथील त्यांचे कार्यलय गाठले मात्र सदर कार्यलय बंद असल्याचे आढळून आले तसेच कदम याने आशा प्रकारे अनेक जणांन गंडा घातल्याचे समोर आले .या प्रकरणी निबरंगी यांनी विष्णू नगर पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवली .या तक्रारी नुसर पोलिसांनी शिवराम शशिकांत कदम व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरू केले आहे.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email