कमला मिल्स अग्नितांडवांला मुंबई महापालिका जबाबदार : आयुक्तांमार्फत चौकशी अमान्य,  सीबीआय चौकशी करा ! राधाकृष्ण विखे पाटील 

(श्रीराम कांदु)

मुंबई :  कमला मिल्स कंपाऊंडमधील हॉटेल्सला आग लागून झालेला १४ जणांचा मृत्यू हे मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचे बळी आहेत. मुंबई शहर भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीच्या तोंडावर असून, आणखी किती मुंबईकरांना आपले प्राण देऊन या अव्यवस्थेची किंमत मोजावी लागेल, अशी संतप्त सवाल  विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. या घटनेला महापालिकाच जबाबदार आहे त्यामुळे आयुक्तांमार्फत चौकशी अमान्य  असून, मुंबईतील अशा घटनांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

ते म्हणाले की, पोलिसांनी संबंधित हॉटेलमालकांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले आहेत. परंतु, या घटनेसाठी हॉटेलमालकांसोबतच महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर, नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांपासून आयुक्तांपर्यंत सारेच दोषी आहेत. या हॉटेलमध्ये अनधिकृत बांधकाम झालेले होते, बांधकामामध्ये आगीला पोषक असे साहित्य मोठ्या प्रमाणात वापरण्यात आले होते, आग लागल्यास ती विझविण्याची सक्षम यंत्रणा तर सोडाच पण बाहेर पडण्याचा सुरक्षित मार्ग देखील या ठिकाणी उपलब्ध नव्हता. या साऱ्या त्रुटींसाठी केवळ हॉटेलमालकच नव्हे तर मुंबई मनपा देखील तेवढीच जबाबदार आहे. येथील अनधिकृत बांधकामाबद्दल मुंबई महापालिकेकडे लेखी तक्रारसुद्धा करण्यात आली होती. तरीही त्याकडे दुर्लक्ष करून १४ जणांच्या मृत्युसाठी कारणीभूत ठरल्याबद्दल मनपा अधिकाऱ्यांवर सुद्धा सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email