कबुतर पाळण्यास दिल्याने त्रिकुटाने केली मारहाण करत ७८ हजारांचे दागिने केले लंपास

डोंबिवली  – कबुतर पाळण्यास का दिले असा जाब विचारत तिघा जणानी  एका तरुणाला बियरच्या बाटली डोक्यावर मारत बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण पश्चिम येथे घडली .या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात आकाश सावंत ,रिकी कडव ,रोहित सोनी विरोधात गुन्हे दाखल करत तपास सुरु केला आहे .

         कल्याण पश्चिमेकडील ठाणकर पाडा येथे पूजा टो वर मध्ये राहणारा सिद्धेश्वर कल्याणकर २२ हा तरुण रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आपले मित्र  आकाश सावंत ,रिकी कडव यांच्या सोबत रोहित सोनी यांच्या न्यू मनिशा नगर येथिल घरात मद्यपान करत बसले होते .या दरम्यान रोहीत ने सिद्धेश्वर ला तू श्रेयसला कबुतर पाळण्यास का दिले असा जाब विचारला त्यामुळे या दोघामध्ये  वाद झाला या वादातून आकाश आणि रोहित ने बियरची बाटली फोडून ती सिद्धेश्वरच्या डोक्यात मारली तसेच रोहित ने सिद्धेश्वर ला बेदम मारहाण करत या तिघांनी त्याच्या गळ्यातील चैन व अंगठी असा एकूण ७८ हजारांचे दागिने काढून घेत तेथून पळ काढला या हल्ल्यात सिद्धेश्वर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी सिद्धेश्वर यांनी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी आकाश सावंत ,रिकी कडव ,रोहित सोनी तिघा विरोधात गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email