कपड्याच्या दुकानात चोरट्यांचा डल्ला
डोंबिवली – कल्याण पूर्वेकडील पत्री पूल परिसरात राहणारे ईदराज हुसेन यांचे कल्याण शिळ रोड गोळवली येथील गुलाब शेठ चाळीत फॅॅशन पॉइंट नावाने कपड्याचे दुकान आहे .गुरवारी रात्री हुसेन यांनी आपल्या दुकानाला टाळे लावून ते घरी निघून गेले .दुकानाला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून दुकानातील ३० हजार रुपये किमतीच्या साड्या ,५ हजार रुपये किमतीचे ड्रेस मटेरियल ,५ हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या किमतीचे कपडे असा मिळून ४० हजारांचा मुद्देमाल लंपास केला .सकाळी दुकानात चोरी झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे .तर दुसरी घटना कोपर येथे घडली आहे .डोंबिवली कोपर येथील आदित्य चाळीत राहणारे यंकटेश सलगर काल पहाटे घरत झोपले असताना अज्ञात चोरटा त्यांच्या घरात घुसला त्याने घरातील रोकड मोबाईल असा मिळून एकूण २९ हजारांचा मुद्देमाल लंपास केला .दरम्यान आवाज झाल्याने सलगर यांना जाग आली त्यांनी आरडाओरड केला मात्र चोरटा पळून गेला या प्रकरणी सलगर यांनी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसर पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .