कधी बनवणार रेल्वे विद्यालयाचा खड्ङयानी भरलेला रस्ता
कल्याण पुर्वे रेल्वे परिसरत रेल्वे हॉस्पिटल, रेल्वे विद्यालय, रेल्वे इंस्टीट्यूट, चर्च, रेल्वे लोको शेड, जायचा एकमात्र मार्ग रेल्वे लाइनच्या खालुन असलेला रास्ता ज्या मध्ये वर्षभर पाणी साठलेलं असते. या पाण्यामुळे ब्रिजखाली खड्डेच खड्डे झाले आहेत.
याकडे रेल्वे प्रशासन लक्ष देत नाही आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनही लक्ष देत नाही.मनपा प्रशासनचं असं म्हणणं आहे की हे क्षेत्र रेल्वे अधिकारांच्या क्षेत्रा मध्ये येत असल्यामुळे येथे कोणतही काम मनपा करू शकत नाही. तिथेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि यूनियनचे अधिकाऱ्याचं येथे नियमित येणंंजाणंं होत असल तरी येथे लक्ष दिले जात नाही. यामुळे येथुन जाणाऱ्या हॉस्पिटलचा रुग्ण, शाळेत जाणारे लहान-लहान मुल यांना पाण्यातुन होऊन जाव लागत. अश्या मध्ये कधीही खड्डे असलेल्या रस्त्यावर अपघात होण्याचीही शक्यता आहे.