कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणारा टेम्पो पकडला; तिघांवर गुन्हा दाखल

परळी – आठ गोवंशीय जनावरे टेम्पोमध्ये दाटीवाटीने कोंबून कत्तलखान्याकडे नेण्यात येत असताना परळीतील हनुमान चौकाजवळ काही तरुणांनी अडविली आणि पोलिसांना बोलावून त्यांच्या स्वाधीन केली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला तर जीपचालकाने गाडी अडविणाऱ्या तरुणांवर देखील मारहाणीचा गुन्हा नोंदविला.

याबाबत अधिक माहिती अशी कि,परळी येथील हनुमान चौकाजवळ गोवंशीय जनावरांना कत्तलखान्याकडे घेऊन जात असलेला टेम्पो (एमएच १३ सीयु ०८८५) अतुल दुबे आणि काही तरुणांनी मिळून अडविला. या टेम्पोत ८ गोऱ्हे दाटीवाटीने कोंबलेले होते. यावरून टेम्पोचालक इरशाद दस्तगीर शेख (रा. पापनास, ता. माढा, जि. सोलापूर) आणि अतुल दुबे यांच्यात वाद सुरु झाला. याची खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चालक इरशाद याच्याकडे अधिक चौकशी केली असता टेम्पो अकबर युसुफ कुरेशी याच्या मालकीचा असून त्याने सदरील जनावरे बार्शीच्या बाजारातून गाडीत भरून दिली आणि परळी गौसभाई याच्याकडे देण्यास सांगितल्याची माहिती त्याने दिली. यावेळी इरशादजवळ वाहन चालक परवाना व आधार कार्ड, गाडीचे कागदपत्रे तसेच जनावरांचे पशुवैदयकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र यापैकी एकही कागदपत्र आढळून आले नाही. त्यामुळे पोलिसांनी पंचनामा करून जनावरे आणि टेम्पो असा एकत्रित ४ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आणि चालक इरशाद, टेम्पो मालक अकबर युसुफ कुरेशी आणि गौसभाई असा तिघांवर कलम १५८, २३, ३ (१), प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलम ११(१)(डी), पशु संरक्षण अधिनियम कलम ५ अन्वये परळी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.

दरम्यान, याच प्रकरणात टेम्पो चालक इर्शाद याने देखील अतुल दुबे आणि राजेश फड यांनी त्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद दिली आहे. इर्शादच्या फिर्यादीवरून अतुल दुबे आणि राजेश फड यांच्यावर कलम ३४१, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये परळी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email