कंपनी मालकाला २ कोटी १६ लाखाना गंडा
कल्याण : परदेशात कंपनीच्या विस्तारासाठी विश्वासने पाठ्वेलेल्या इसमाने एका महिलेच्या साथीने कंपनीच्या मालकाला तब्बल २ कोटी १६ लाख ३८ हजारणगंडा घातल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
मुंबई येथे राहणारे जयदीप द्त्तगुप्ता हे पिटी इमको ग्लोबल टेक कोन या कंपनीचे डायरेक्टर असून त्यांनी जानेवारी २०१६ रोजी इंडोनेशिया येथे व्यापार विस्तार उद्देशाने कंपनीचे कुलमुखत्यार म्हणून कंपनीचे वाईस प्रेजीडेंट अस्लम शेख याला पाठवले होते मात्र शेख ने या कुलमुखत्यार पत्राचा गैरवापर करत त्याला दिलेल्या अधिकार्यांचा गैरवापर करत समजोता करार मधील अटी शर्तींचा भंग करत दत्तगुप्ता यांची फसवणूक केली. शेख याने कंपनीसाठी पाठवलेले यंत्राचे सुटे भाग चढ्या दराने विकून त्याचा नफा कंपनीला न देता फसवणूक केली तसेच सदर कंपनीच्या इंडोनेशिया येथील शाखेच्या विस्तार व्यवस्थापक व तेथिल नागरिक समगीता पुत्री या देखील या फसवणुकीत सामील होत्या. अस्लम शेख व समगीता पुत्री विरोधात २ कोटी १६ लाख ३८ हजार ९७६ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अस्लम शेख व समगीता पुत्री विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
Please follow and like us: