औरंगाबादमध्ये भाजप पदाधिकाऱ्यावर तलवारीने हल्ला

औरंगाबादमध्ये भाजप नेत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे. जिल्हासरचिटणीस संजय फत्तेलष्कर यांच्यावर बेगमपुरा भागात हा हल्ला झाल्याची माहिती मिळालेली आहे.विद्यापीठ परिसरात व्यायाम करून संजय फत्तेलष्कर परत येत होते.तेव्हच मिरची पूड फेकून कारमध्ये आलेल्या चार ते पाच जणांनी तलवारीने हल्ला चढवला.संजय यांना गंभीर अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल आहे. हल्ल्याचं नेमकं कारण काय हे आजूनही माहीत नाही. बेगमपुरा पोलीस पुढील तपास करत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email