ओळख वाढवून प्रवाशांना लुबाडणारे काका पुतन्यासह त्यांचा साथीदार गजाआड
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.२२ – उत्तर भारताच्या दिशेने जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांशी ओळख करुन त्यांना लुटणाऱ्या काका पुतण्या टोळीला सीसीटीव्हीच्या मदतीने त्यांच्या साथीदाराला कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून लुबाडलेला मुद्देमाल ही जप्त करण्यात आला आहे. चांद मोहंमद, दीन मोहंमद आणि फरहान खान अशी या तिघांची नावे आहेत .
कल्याण रेल्वे स्थानकावर उत्तरप्रदेश येथे जाण्यासाठी श्याम पटेल व त्यांचा भाचा हे दोघे आले होते. यावेळी चांद मोहंमद, दीन मोहंमद आणि फरहान खान हे तिघे भामटे त्यांच्या मागावर होते. त्यांनी श्याम यांना उत्तर प्रदेशाला जाणाऱ्या गाडीत आमचा भाऊ चांदला सोबत घेऊन जा अशी विनंती केली. कल्याणहून गाडी मिळणार नाही असे बोलून श्यामला आणि त्याचा भाचाला लोकमान्य कुर्ला टर्मिनसला घेऊन गेले. विद्याविहार रेल्वे स्थानकात उतरून लोकमान्य कुर्ला टर्मिनसला जाताना रस्त्यातच संधी साधत दीन मोहंमद व फरहान यांनी मामा भाच्याला चेहऱ्यावर आणि अंगावरप्राणघातक हल्ला करुन त्यांच्या जवळचे साहित्य घेऊन पळ काढला. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी अद्नन्यात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता. अखेर पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही तपासत या चोरट्यांची ओळख पटवत चांद मोहंमद, दीन मोहंमद या काका पुटण्यासह त्यांचा साथीदार फरहान खान याला अटक केली आहे. त्यांच्याकडून लुटलेला मुद्देमाल जप्त करन्यात आला आहे. दरम्यान अटक आरोपी हे मूळचे उत्तर प्रदेशातील राहणारे आहेत.ते दिवसा एका काचेच्या कारखान्यात काम करायचे व कामावरुन सुटल्यावर ते प्रवाशाना लुबाडण्याचे काम करीत होते.या तिघांनी आशा प्रकारे आणखी काही जणांना लुबाडल्याची शक्यता वर्तवन्यात येत असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.