ओम शिव गणेश इमारतीच्या पुर्नबांधणीला परवानगी मिळणार….  

डोंबिवली – पूर्वेकडील सुनील नगर मधील डी.एन.सी. रोडवरील म्हात्रे कंपाउंड जवळील ओम शिव गणेश इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना  सोमवारी दुपारच्या वेळी पिलरला तडे गेले. त्यामुळे २२ कुटुंबीय बेघर झाले. मंगळवारी सकाळी पालिका आयुक्त गोविंद बोडके, महापौर राजेंद्र देवळेकर , आमदार सुभाष भोईर यांसह माजी नगरसेवक पंढरीनाथ पाटील आणि शिवसेना पदाधिकारी किशोर मानकामे यांनी सदर इमारतीची पाहणी केली. येथील रहिवाश्यांशी चर्चा करून कागदपत्र आणि नकाशा सादर करा १५ दिवसात इमारतीची पुर्नबांधणीला परवानगी देण्याचे आश्वासन दिले.

      या इमारतीतील रहिवाश्यांनी इमारतीची पुर्नबांधणीला परवानगी तातडीने देण्याची मागणी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे केली. ही इमारत अधिकृत असल्याने परवानगी मिळण्यास अडचण येणार नाही. मात्र या इमारतीतील रहिवाश्यांना तात्पुरता निवाऱ्यासाठी डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाडी येथील रात्र निवारा केंद्रात सोय केल्याचे सांगण्यात आले.दरम्यान या इमारतीच्या दुरुस्तीचे काम ज्या ठेकेदारला दिले होते त्या ठेकेदाराला रहिवाश्यांनी जबाबदार ठरविले आहे.इमारतीच्या दुरुस्तीसाठी रहिवाश्यांनी दिलेली रक्कम रहिवाश्यांना परत केली पाहिजे असे रहिवाशी कैलाश पवार यांनी सांगितले. 

Please follow and like us:
Pin Share

Hits: 20

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email