ऑर्थोपेडिक डायग्नोस्टीक शिबीरामुळे भिवंडीतील २५० रहिवाशांना झाला फायदा

श्री हलारी व्हिसा ओसवाल समाज आणि यूएसएसएच रुग्णालयाच्या मदतीने केले गेले शिबीराचे आयोजन

 भिवंडी – श्री हलारी व्हिसा ओसवाल समाजाकडून ऑर्थोपेडिक निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. उपासनी सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल (यूएसएसएच) ने १८ मार्च २०१८ रोजी भिवंडीच्या रहिवाशांसाठी मोफत वैद्यकीय सल्ला ही दिला. या शिबिरात २५० हून अधिक नागरिक उपस्थित होते. तसेच गुडघ्याच्या व रक्तातील विकारांवरील चर्चासत्राचा त्यांनी लाभ घेतला.

यूएसएसएच हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक आणि संयुक्त रिप्लेसमेंट सर्जन डॉ. तेजस उपसणी यांनी सांगितले की, “आम्ही अशी जास्तीत जास्त समाज उपयोगी शिबिरे आयोजित करू इच्छितो तर अशा शिबिरांमध्ये सहभागी होऊ इच्छितो. गुडघा आणि पाठीच्या कणाच्या समस्या ही सर्वसामान्य गोष्ट आहे. या समस्येला प्रत्येकास रोजच्या आयुष्यात तोंड द्यावे लागते,  त्यामुळे जनतेला योग्य ती माहिती या कार्यक्रमात दिली गेली.”

तेथे डॉ. तेजस उपासनी व डॉक्टर, फिजिथेरपिस्ट आणि पोषण- विशेषज्ञ यांच्या पथकाने विविध आजारांवर आणि त्याच्यापासून बचाव करण्याच्या पद्धतींवर चर्चा केली. व्यायाम सत्र आयोजित केले गेले होते. तेथे फिजिओथेरपिस्टच्या टीमने प्रेक्षकांना विशिष्ट प्रकारचे गुडघाच्या आजारांचा सामना कसा करावा हे दाखवले.

 

 

 

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email