ऑर्केस्ट्रा कलावंतांची आगळीवेगळी मैत्री, आपला मित्र पूर्ण बरा व्हावा यासाठी एकत्र येवून घेतला पुढाकार

मित्र असावेत तर असे

मुंबईतील ऑर्केस्ट्रा कलावंतांची आगळीवेगळी मैत्री आता सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.अर्धांगवायुचा झटका आल्याने एक कलावंत रुग्णालयात दाखल असताना इतर कलाकारांनी एकत्र येवून आपला मित्र पूर्ण बरा व्हावा यासाठी पुढाकार घेतल्याची एक  घटना नुकतीच पहाण्यात आली आहे. अर्धांगवायुचा झटका आल्याने कोणतीच हालचाल करणे शक्य नसल्याने बँकेत पैसे असुनही ते काढणे शक्य नव्हते अशावेळी आपल्या या मित्राचे उपचार योग्य प्रकारे व्हावेत यासाठी मुंबईतील कलाकारांनी एकत्र येवून त्याला मदतीचा हात तर दिलाच पण आता पुढील उपचारांसाठी त्याला नगर येथे नेण्यासाठीही ते सज्ज झाले आहेत.

२९ एप्रिल रोजी कीबोर्डीस्ट वील्सन कसबे यांना अर्धांगवायुचा झटका आला.या अर्धांगवायुच्या झटक्यात त्यांंची शरीराची उजवी बाजु निकामी झाली.कोणतीच हालचाल करणे शक्य नसल्याने बँकेत पैसे असुनही ते काढणे वील्सन कसबे यांना शक्य नव्हते.त्यावेळी मुंबईतील ऑर्केस्ट्रा कलावंतांनी आपआपल्या परिने  मदत काढुन २५ ते ३० हजार रुपये गोळा करुन त्याना त्वरीत हॉस्पीटलमध्ये दाखल केले व यानंतरही कलावंतांनी मदचा ओघ सुरुच ठेवला व आता विल्सनला घरी आणण्यात आले आहे.

नवीमुंबई,ठाणे,भिवंडी,अंबरनाथ,बदलापुर,उल्हासनगर व कल्याण डोंबीवलीतील कलावंतांनी आपल्यापरीने विल्सनसाठी मदतीचा हात पुढे केला.कल्याण विभागाच्या वतीने प्रविण गायकवाड(शिवा) यांनी कलावंताकडुन मदत गोळा केली.दिनांक २३ मे २०१८रोजी अजितकुमार व प्रविण गायकवाड यांनी विल्सनच्या घरि जावुन त्यांची व कुटुंबाची भेट घेतली तसेच कलावंताकडुन जमा केलेली मदत रोख रक्कम ११०००/- विल्सनचे मावस भाऊ विल्सन आढाव यांना दिली यावेळी कलावंत मिलींद खरात,गिरीश सांजकर,अजितकुमार व शिवा गायकवाड, सुनिल वाघमारे उपस्थित होते.विल्सनला पुढील ट्रिटमेंटसाठी नगर येथे २७ मे२०१८ रोजी नेणार आहेत त्यावेळी मुंबईचे काही कलावंत हे विल्सनच्या कुटुंबीयांसोबत जाणार आहेत.दरम्यान ऑर्केस्ट्रा कलावंतांची ही मैत्री आता सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.

विल्सनचा मावस भाऊ विल्सन आढाव यांच्या हातात कल्याण विभागाच्या वतीने रु.११०००/-ची रोख रक्कम सुपुर्द केली.त्यावेळी अजितकुमार,विल्सन आढाव,गिरीश सांजेकर,मिलिंद खरात,सुनिल वाघमारे व शिवा गायकवाड

Please follow and like us:
Pin Share

Hits: 279

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email