‘ऑपरेशन ऑल आउट’! काश्मिरात भेटले यश ५ दहशतवाद्यांचा खात्मा

 जम्मू-काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांना ‘मिशन ऑल आउट’ला आज मोठे यश मिळालेले. जवानांनी येथे ५ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर देखील यामध्ये मारला गेला आहे. सुरक्षा रक्षाकांनी हिजबुलचा कमांडर सदाम पद्दार आणि त्याच्या दोन साथीदारांना बिलाल मौलवी आणि आदिलला ठार केलं आहे. दुसरीकडे दहशवतादी मोहम्मद रफीला देखील जवानांनी ठार केलं आहे. रफी भट्ट हा काश्मीर विद्यापीठाचा प्राध्यापक आहे.

या कारवाई दरम्यान २ जवान जखमी झाले आहेत. प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव दक्षिण काश्मीरमध्ये मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद केली आहेत. चकमक सुरू झाल्यानंतर दहशतवाद्यांना जवानांनी शरणागती पत्करण्यास सांगितले होते. मात्र त्यांच्याकडून गोळीबार सुरूच राहिल्याने सुरक्षा दलानं अत्यंत नेटानं किल्ला लढवत ५ दहशतवाद्यांचा खात्मा केला. आणि पाचही दहशतवाद्यांचे मृतदेह लष्कराने ताब्यात घेतले आहेत. परिसरात शोधमोहिम अजूनही सुरू असल्याची माहिती भेटलेली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email