ऑनलाईन वीज बिले भरण्यावर भर

महावितरणच्या २८ टक्के ग्राहकांचा

ऑनलाईन वीज बिले भरण्यावर भर
ठाणे दि ५: ठाणे जिल्ह्यात डिजिटल पेमेंटकडे नागरिकांचा ओढा वाढत असून विशेषत महावितरण कंपनीची वीज बिले ऑनलाईन भरण्याकडे कल आहे असे अधीक्षक अभियंता ठाणे सर्कल संतोष वाहाने यांनी माहिती दिली. डिजिटल पेमेंटबाबत जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्याकडील नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी सांगितले की सुमारे २७ ते २८ टक्के ग्राहक ऑनलाईन बिल अदा करीत असून ही संख्या पुढील काळात वाढणार आहे.
विशेष म्हणजे उच्च दाब वीज ग्राहक जे की व्यवसायिक किंवा उद्योग आहेत त्यांचेही प्रमाण यात समधानकारक आहे. ठाणे जिल्ह्यात महावितरणचे भांडूप, मुलुंड, ठाणे एक, ठाणे दोन, ठाणे तीन, वागले इस्टेट असे ६ डिव्हिजन येतात. गेल्या एप्रिल ते नोव्हेंबर २०१७ या ८ महिन्यातील आकडेवारी त्यांनी सादर केली.

विभागनिहाय ऑनलाईन बिले भरलेल्या ग्राहकांची संख्या, आणि टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे

एप्रिल ९ लाख २१ हजार ८२० पैकी २ लाख १३ हजार १३८ ग्राहकांनी ऑनलाईन पेमेंट केले. मे ९ लाख २१ हजार ८२० पैकी २ लाख ३७ हजार ५९० ग्राहकांनी, जून ९ लाख २१ हजार ८२० पैकी २ लाख १४ हजार ९३७ ग्राहकांनी, जुलै ९ लाख २८ हजार ८५७ पैकी २ लाख २८ हजार १० ग्राहकांनी ऑनलाईन पेमेंट केले. ऑगस्ट ९ लाख ३२ हजार ९३३ पैकी २ लाख २१ हजार २४९ ग्राहकांनी, सप्टेंबर ९ लाख ३५ हजार २९० पैकी २ लाख २७ हजार ६२६ ग्राहकांनी ऑनलाईन पेमेंट केले. ऑक्टोबर ९ लाख ४० हजार पैकी १ लाख ८० हजार ६८ ग्राहकांनी ऑनलाईन पेमेंट केले. नोव्हेंबर ९ लाख ४० हजार पैकी १ लाख ८० हजार ९१ ग्राहकांनी ऑनलाईन पेमेंट केले.

एकूण ५१९ उच्च दाब ग्राहकांपैकी ऑक्टोबर मध्ये १८ तर नोव्हेंबर मध्ये ३४ जननी ऑनलाईन पेमेंट केले. एकंदरीत २७ ते २८ टक्के ग्राहक या सुविधेचा फायदा घेत असून इतर ग्राहकांनी देखील ही सुविधा वापरावी म्हणून महावितरण विविध मार्गाने या सुविधेची माहिती करून देत आहे असे जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले यांनी सांगितले

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email