ऑनलाइन च्या आधारे ३१ हजारांना गंडा
डोंबिवली दि. ३० – कल्याण पश्चिम गोदरेज हील गोदरेज परडाईज मध्ये राहणारे अशोक वाघ यांना काही दिवसांपूर्वी एक फोन आला. फोन वर बोलणाऱ्या इसमाने त्याच्याकडे असलेले बँकेचे क्रेडिट कार्ड सुरू करायचे असेल तर कार्डची माहिती द्या असे सांगितले मात्र वाघ यांना संशय आल्याने त्यांनी फोन कट केलं.
त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी पुन्हा एका इसमाने फोन करत आपण बँकेतून बोलत असल्याचे भासवत कार्डची माहिती द्या अन्यथा कार्ड बंद होईल असे सांगितले त्यामुळे वाघ यांनी त्याला नंबर देऊ केला .या माहितीच्या आधारे वाघ यांच्या कार्ड मधून ऑनलाइन च्या माध्यमातून तब्बल 31 हजार 958 रुपये परस्पर पेटीएम ला वळते केले .सदर बाब निदर्शनास येताच वाघ यांनी खडकपाडा पोलिस स्थानाकात धाव घेत तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसानी अद्न्यत भामट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.