ऑनलाइनवर लॅपटोप देण्याचे आमिष दाखवत ३२ हजारांना गंडा
डोंबिवली – कोणतीही खातरजमा न करता ओनलाईन वर वस्तू खरेदी करण्याचे पेव फुटले असून यातून अनेकदा ग्राहकांची फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत .मात्र ओनलाईन खरेदी चे क्रेज काही कमी होत नसल्याने फसवणुकीच्या घटना वाढू लागल्या आहेत अशी एक घटना डोंबिवली मध्ये उघडकीस आली आहे .डोंबिवली पूर्वेकडील मयाकृपा सोसायटी मध्ये राहणारे तुषार जोशी याना लॅपटोप खरेदी करायचा असल्याने त्यांनी ओनलाईन शोध सुरु केला यावेली त्यांनी एका वेबसाईट वर असलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता समोरून बोलणा-या अज्ञात इसमाने त्यांना ऑफर सुरु आहे तुम्ही ३२ हजार रुपये बँक खात्यावर भरा असे सांगत खाते नंबर दिला .स्वस्तात लपटोप मिळेल या आशेने तुषार यांनी सदर रक्कम बँक खात्यात जमा केली मात्र बराच कालावधी उलटूनही लपटोप न मिळाल्याने त्यांनी पुन्हा या इसमाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र या इसमाने टाळाटाळ करत फोन बंद केला .आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्या नंतर त्यांनी या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात अज्ञात इसमा विरोधात तक्रार दिली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .