ऑटो रिक्षा चालक मालक संयुक्त कृती समिती महाराष्ट्र २६ जून रोजी राज्यव्यापी आंदोलन करणार
कल्याण – ऑटो रिक्षा चालक मालक संयुक्त कृती समिती महाराष्ट्र २६ जून रोजी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. या बाबत कल्याण येथे झालेल्या बैठीत रिक्षा चालक मालकांच्या विविध संघाटना सामील झाल्या होत्या.यात महाराष्ट्र रिक्षा पंचायत , रिपब्लिकन रिक्षा संघटना, मुंबई रिक्षा युनियन, धडक युनियन, राष्ट्रवादी संघाटना आदी या बैठकीत सामील झाल्या होत्या.
२६ जून रोजी होणाऱ्या या राज्यव्यापी होणाऱ्या आंदोलना बाबत या बैठकीत भूमिका मांडण्यात आली. या आंदोलनाच्या मागण्या या केंद्र सरकारने मंजूर केलेले नवीन वाहन मोटर विद्येयक रद्द करण्यात यावे, बजाज टिव्हीएस पियोजिओ या कंपनी आणि त्यांचे डीलर यांच्या वतीने रिक्षा चालका आरटीओ टेक्सची लूट केली जात आहे ती थांबली पाहिजे, कल्याण डोंबिवली येथील रिक्षा चालक मालकाना सीएनजी किट साठी प्रत्येकी १५ हजार रुपये अनुदान मिळावे, कल्याण शहरातील बेकायदेशीर वाहतूक बंद झाली पाहिजे, ओला उबेर या भांडवदार कंपण्याच्या वतीने बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करण्यात येत आहेत . या मुळे या सर्व कंपन्या बंद करण्यात याव्यात, रिक्षा युनियनची भरमसाठ झालेली वाढ रद्द करण्यात यावी अश्या मागण्यान बाबत हे आंदोलन करण्यात येणार आहे.
या झालेल्या बैठकीला महाराष्ट्र कृती समितीचे अध्यख बाबा कांबळे, शरद राव यांच्या युनियनचे प्रमोद घोणे, रिपब्लिकन रिक्षा संघटनेचे राहुल कांबळे, राष्ट्रवादी रिक्षा युनियनचे ज्ञानेश्वर सोनावणे, रामा काकडे, मारुती कोडे ,शिवाजी मोरे, बाळा जगदाळे आदी रिक्षा युनियनचे कार्यकर्ते उपस्थित होते.