एसटीच्या वायफाय सेवेचा बोजवारा

प्रवासा दरम्यान बच्चेकंपनी, तरूणाई व जेष्ठ नागरिक प्रवाशी नाराज 

(श्रीराम कांदु)

डोंबिवली – रेल्वे ही सेवा नागरिकांसाठी जीवनवाहिनी आहेत तर एसटीला ग्रामीण आणि शहरी भागाला जोडणारा दुवा आहे. मात्र  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून  खाजगी कंपनीद्वारे पुरविण्यात येणा-या मोफत वायफाय सेवेचा मोठा गाजावाजा करण्यात आला. परंतु  ही सेवा तांत्रिक प्रयत्न करून सुध्दा उपलब्ध होत नसल्याने प्रवाशी अत्यंत नाराज आहेत.बच्चेकंपनी, तरूणाई व जेष्ठ नागरिक प्रवाशी याबात आपली नाराजी प्रवासा दरम्यान बोलून दाखवित आहेत.

    महामंडळाच्या नाकर्ते अधिका-यांमुळे एसटीचे डिजीटलायझेशनचे हे पहिले पाउल असलेल्या वायफाय सेवेचा बोजवारा उडाला आहे.  खाजगी प्रवाशी वाहतूकदारांशी स्पर्धा करण्यासाठी व जास्तीत प्रवाशी मिळविण्यासाठी आँगस्ट २०१६ साली एका खाजगी कंपनीद्वारे वायफायचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात करण्यात आला. महामंडळाकडून अठरा हजार बसेस राज्यांतर्गत चालविल्या जातात.दररोज सुमारे सत्तर लाख प्रवाशी यातून प्रवास करतात. यातील काही प्रवाशांना गाणी व चित्रपट या वायफाय सेवेद्वारे पहायला मिळणार होते. मात्र फेसबुक व वाँटस अँप यांची सेवा प्रवाशासांठी उपलब्ध नव्हती. एका खाजगी कंपनीद्वारे हा वायफायचा प्रकल्प पहिल्या टप्प्यासाठी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या विभागात वायफाय राबविण्यात येणार असल्याचे महामंडळाच्या  माध्यमातून सांगण्यात आले.तर दुस-या टप्प्यात कोल्हापुर विभागातील प्रवाशांसाठी वायफायची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार होती. याची महामंडळाच्या एसटी मध्ये आतून बाहेरून वायफाय सेवेची जोरदार जाहिरात करण्यात आली.पुणे महापालिकेने पुणे विभागातील स्वारगेट व शिवाजीनगरात शिवनेरी व एशियाड बसेस मध्ये प्रवाशांसाठी हि सेवा उपलब्ध करून दिली. विमानतळ, रेल्वे स्थानक, संस्था, हाँटेल, पब, माँल, पार्लर, गेम झोन इत्यादी  ठिकाणी मोफत वायफायची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.एसटी सारख्या निम्न वर्गीयांसाठी राज्यांतर्गत सेवा देणा-या बसेस मध्ये वायफायच्या सुविधेचा लाभ घेऊ  पहाणारे लाखो प्रवाशी आहेत. परन्तु  एसटीचे डिजीटायझेनचे हे पहिले पाउल महामंडलाच्या नाकर्ते अधिका-यांमुले खड्ड्यात अडकले आहे वायफाय सेवेचा बोजवारा उडाला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email