एकनाथ खडसे यांच्या बदनामी खटल्यात,अंजली दमानिया विरोधात पकड वॉरंट

 

रावेर कोर्टाचे सांताक्रूझ पोलीसांना आदेश

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर विविध आरोप करुन बदनामी करणाऱ्या मुंबईतस्थित समाजसेविका अंजली दमानिया यांच्या विरोधात रावेर न्यायालयाचे न्या. डी. जी. मालविय यांनी आज पकड वाॉरंट जारी केले. हे वॉरंट हस्ते पाकिटातून बजावण्यात येणार आहे. त्यामुळे अंजली दमानिया जेथे असतील तेथे त्यांना अटक होवू शकेल.

जावायाची लिमोझीन कार, भोसरी भूखंड प्रकरण, अपसंपदा गोळा करणे, कार्यकर्त्याचे लाच प्रकरण आदी विषयांवर बेछूट आरोप अंजली दमानिया यांनी जळगावात येवून केल्याबद्दल भाजपचे रावेर तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी खडसेंची बदनामी केल्याचा खटला (क्रमांक 416) कलम (500 व 501) नुसार भरला आहे. या खटल्याचे रितसर समन्स प्राप्त होवूनही अंजली दमानिया कोर्टात हजर होत नव्हत्या. म्हणून आज अखेर त्यांच्या विरोधात न्यायाधिशांनी पकड वॉरंट काढले. या खटल्यात फिर्यादीतर्फे ॲड. चंद्रजित पाटील व ॲड. तुषार माळी काम पाहत आहेत.

Hits: 15

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email