उसने पैसे परत दिले नाही म्हणून लाकडी दांडक्याने मारहाण

डोंबिवली  – कल्याण रेती बंदर रोड येथे राहणारा कल्याण जाधव (४१) हा मजुरी करून आपल्या कुटुबाचा उदरनिर्वाह करतो त्याने अनिल आडे व संतोष आडे यांच्याकडून उसने पैसे घेतले होते मात्र काही कारणास्तव उसने घेतलेले पैसे वेळेत परत न करता आल्याने अनिल व संतोष संतापले होते .या दोघांनी काल दुपारच्या सुमारास कल्याण जाधव यांना दुर्गाडीच्या पायथ्यालगत गाठले त्यांनी जाधव यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच संतोष याने जाधव यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारून त्यांना जाख्मी केली या प्रकरणी जाधव यांनी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अनिल आडे व संतोष आडे विरोधात गुन्हा दाखल केला आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email