उष्माघातामुळे परळीतील व्यापाऱ्याचा मृत्यू
परळी – उष्माघातामुळे व्यापाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना परळी येथे घडली.अजय रमेश सोनपेठकर (वय ३२) असे त्यांचे नाव असून शुक्रवारी दुपारी सदर घटना घडली.परळी येथील सराफा व्यापारी अजय रमेश सोनपेठकर यांचा उष्माघाताने मृत्यू झाला.अजय सोनपेठकर हे आपल्या दुकानात काम करत असताना शुक्रवारी दुपारी १ च्या दरम्यान त्यांना चक्कर आली आणि ते जमीनीवर कोसळले. दुकानात काम करणाऱ्या व्यक्तींनी त्यांना ताबडतोब परळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे गेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सोनपेठकर यांच्या मृत्यूची बातमी समजताच राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरातील व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद केली.सोनपेठकर यांचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. शहरात वाढत असलेले तापमान आता ४५ डिग्री सेल्सियसपर्यंत पोचले आहे.
Please follow and like us: