उल्हासनगर येथे बिबट्या शिरल्याने एकच खळबळ

जेव्हा बिबट्या घरात शिरतो ….

(स्वदेश मालवीय)

उल्हासनगर – उल्हासनगर येथे एक बिबट्या आल्याने शहरात एकच खळबळ माजली होती. एफडियोने ८ तास प्रयत्न करून अखेर या बिबट्याला पकडले.
उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील भाटिया चौकातील बंद सोनम क्लासेस मधे आज सकाळी हा बिबट्या घुसला .

येथे बाजुलाच तबेला असल्याने गवताच्या गाडीतून हा बिबट्या येथे आला असावा असा अंदाज आहे.बिबट्याचा खुलेआम होणारा वावर पाहून या परिसरात भितीचं वातावरण पसरल होतं.एका महिलेने बिबट्याला पाहिल्याने तिने आसपासच्या रहिवाशांना याबद्दल सांगितले.थोडा वेळ उलटताच त्याने तेथून निघून रस्त्याच्या पलीकडे असणा-या असरानी यांच्या घरात प्रवेश केला. फॉरेस्ट डिविजनल ऑफीसर मुंबई यांच्या टीमच्या मदतीने ८ तासांच्या प्रयत्नांनंतर त्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलं.हा बिबट्या एव्हढा होता की त्याला पाहून तेथील रहिवाशी थकक झाले.
हेतेंद्र रामगोलामकर ( फॉरेस्ट डिविजनल ऑफीसर मुंबई)यांनी याबद्दल बोलताना सांगितलं की बिबट्याला इजा पोहोचू नये याचा विचार करत काम करावं लागत असल्याने सुमारे ८ तास प्रयत्न करत त्याला पकडण्यात आले असून त्याला सुरक्षित स्तळी सोडण्यात येणार आहे.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email